Breaking News

तळोजा फेज दोनमधील दफनभूमी आणि स्मशानभूमी दुरुस्तीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी

तळोजा फेज दोनमधील दफनभूमी आणि स्मशानभूमीची दुरुस्ती करून नागरिकांना तेथे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरात लवकर अंदाज पत्रक तयार करून त्याला मंजुरी घेण्याच्या सूचना सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 7) महापालिकेत झालेल्या बैठकीत पालिका अभियंत्यांना दिल्या.

पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा फेज दोन मधील  मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांच्या दफनभूमी व हिंदूंच्या स्मशानभूमीची अवस्था दयनीय झाल्याबद्दल तेथील नागरिकांच्या तक्रारी आल्याने सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी (दि. 6) रोजी त्या ठिकाणी नगरसेवक हरेश केणी, निर्दोष केणी, प्रल्हाद केणी व वासुदेव पाटील यांच्या समवेत भेट देऊन पाहाणी केली. या तिन्ही ठिकाणी अत्यंत दयनीय अवस्था असल्याचे पाहून सभागृह नेत्यांनी गुरुवारी महापालिकेत स्थानिक नागरिक व पालिका अभियंत्यांसोबत बैठक घेतली.

या बैठकीत सभागृह नेत्यांनी तळोजा फेज दोन मधील दफनभूमी आणि स्मशान भूमीची दुरुस्ती करून तेथे बसण्यासाठी व प्रार्थना करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, शौचालयाची सुविधा, कार्यालय व सुरक्षा रक्षक केबिन उपलब्ध करून देण्याच्या सूचना महापालिका कार्यकारी अभियंता संजय काटेकर व शहर अभियंता संजय जगताप यांना दिल्या. हिंदूंची स्मशानभूमी अद्याप महापालिकेकडे हस्तांतर झालेली नाही. ती हस्तांतर करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून तिन्हीचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी पाठवण्यास सांगितले.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply