Breaking News

शिहू बेणसे विभागातील पाच खेळाडूंची चमकदार कामगिरी; राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेकरिता निवड

पाली ः प्रतिनिधी

शिहू बेणसे विभागातील पाच खेळाडूंची राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेकरिता निवड झाली आहे. स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 47वी राष्ट्रीय जलतरण, वॉटर पोलो, ड्रायव्हिंग स्पर्धा 19 ते 23 ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथे होणार आहे. या स्पर्धेकरिता स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पुण्यातील डेक्कन जिमखाना जलतरण तलाव येथे खुली निवड चाचणी घेण्यात आली होती. यात रिलायन्स इंडस्ट्रीज लि. नागोठणे हेल्थ क्लबमधील जलतरणपटू भारत चंद्रकांत कुथे, ओंकार अनंत माळी, साहिल सुरेश कुथे, सार्थक मारुती इंद्रे, प्रेषिता तरे या पाच खेळाडूंना राष्ट्रीय स्थरावर खेळण्याची संधी प्राप्त झाली आहे, तर प्रेम राज पाटील या खेळाडूची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंचे बेणसे सरपंच मधुकर पारधी, सामाजिक कार्यकर्ते उद्धव कुथे, माजी सरपंच प्रीती कुथे, कामगार नेते अरुण कुथे, यशवंत कुथे, चंद्रकांत कुथे, राजेश गोरे आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply