अलिबाग ः प्रतिनिधी
पुणे येथे होणार्या महिला चॅलेंजर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी रायगडचा महिला क्रिकेट संघ पुण्याला रवाना झाला. रायगडच्या महिला संघाच्या कर्णधारपदाची धुरा नियती जगताप हिच्याकडे सोपविण्यात आली आहे. अंजली गोडसेची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी रायगडचा महिला संघ जाहीर केला. रायगड जिल्ह्यातील महिला क्रिकेटपटू तयार व्हाव्यात त्यांना जास्तीत जास्त सामने खेळण्यास मिळावेत यासाठी जिल्ह्यात महिला क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे चंद्रकांत मते यांनी सांगितले.
असा आहे संघ ः नियती जगताप (कर्णधार), अंजली गोडसे (उपकर्णधार), निविया आंब्रे, आदिती कदम (यष्टीरक्षक), समृद्धी कांबळे, साक्षी लाड, श्वेता सावंत, त्रिशा जामवळ, तनिशा शर्मा, समिधा तांडेल, रोशनी पारधी. प्रशिक्षक निलम पाटील, व्यवस्थापक अंजली गोडसे.