Breaking News

पेण म्हाडा कॉलनीत घरफोडीची घटना

पेण : प्रतिनिधी

शहरातील म्हाडा कॉलनीमधील बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 43 हजार रूपये रोख रक्कमेसह, लॅपटॉप, आयपॅड असा ऐवज चोरून नेला.

 म्हाडा कॉलनीतील प्लॉट नं. 495 येथे यशोदा बंगला असून, मालक बंगला बंद करून बाहेर गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने बंगल्याचे लोखंडी खिडकीचे ग्रील व काचेची खिडकी उपकवून बंगल्यात प्रवेश केला व कपाटातील 43 हजार रूपये रोख रक्कम, लॅपटॉप, आयपॅड आदि ऐेवज चोरून नेला. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक कदम करीत आहेत.

-पेणमध्ये दुचाकीची चोरी

पेण : येथील रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराच्या कमानीजवळ उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. बोरगाव येथील मोटारसायकल मालकाने त्यांची होंडा कंपनीची अ‍ॅक्टीव्हा (केए-32,ईआर-3695) बुधवारी दुपारी 2 वाजता उभी करून ठेवली होती. सदर मोटारसायकल तेथून दुपारी 2 ते रात्री 11.15 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरटयाने चोरून नेली. चोरीस गेलेल्या या मोटारसायकलची किंमत 20 हजार रूपये असून या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार दोरे करीत आहेत.

-स्कुटीला ट्रकची धडक, दोन जखमीपेण : मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील उंबर्डे गावाच्या हद्दीत पेणकडून वडखळकडे जाणार्‍या ट्रक (एमएच-12,जीटी-4599) ने गुरूवारी (दि. 19) दुपारी पुढे जाणार्‍या  स्कुटी (एमएच-06,बीझेड-9547)ला ठोकर दिली. सदर अपघातात स्कुटीवरील शुभांगी संतोष पाटील (वय 32), सार्थक संतोष पाटील (वय 5, दोघे रा.कारावी) जखमी झाले असून, त्यांच्यावर पेण उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास महिला पोलीस नाईक के. ए. कांबळे करीत आहेत.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply