Friday , September 29 2023
Breaking News

श्रीलंकेच्या मलिंगाची निवृत्तीची घोषणा

कोलंबो : वृत्तसंस्था

श्रीलंकेचा कर्णधार आणि यॉर्कर किंग गोलंदाज लसिथ मलिंगा याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढील वर्षी होणार्‍या ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तो निवृत्त होणार आहे; तर इंग्लंडमध्ये होणार्‍या विश्वचषक स्पर्धेनंतर तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत दुसर्‍या सामन्यात श्रीलंकेचा संघ पराभूत झाला, त्यानंतर मलिंगाने ही घोषणा केली.

विश्वचषकानंतर माझी कारकिर्द संपणार आहे. मला टी-20 विश्वचषक खेळायचा आहे. त्यामुळे मी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर त्या प्रकारातून निवृत्त होत आहे; तर टी-20 विश्वचषकानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे, असे मलिंगा म्हणाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात रिधा हेंड्रीक्सला बाद करून मलिंगाने टी-20मधील आपला 97वा बळी टिपला. या प्रकारात सर्वाधिक 98 गडी टिपण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. हा विक्रम मोडण्यासाठी मलिंगाला केवळ एकच गडी बाद करण्याची गरज आहे. दरम्यान, मलिंगा सध्या पुन्हा एकदा आयपीएलमध्ये दिसणार आहे, पण या स्पर्धेच्या पहिल्या सहा सामन्यांना तो मुकणार आहे.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply