Breaking News

नवी मुंबईत दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

सानपाडा नोडमधील प्रभाग 76 मधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांच्या माध्यमातून तसेच साईभक्त महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष शारदा पांडुरंग आमले यांच्या सहकार्याने ‘एक दिवा राम मंदिरासाठी’, ‘एक दिवा श्री रामासाठी’ अशी संकल्पना पुढे घेवून येत साईभक्त महिला फाउंडेशन व प्रभाग 76 भाजपच्या वतीने सानपाड्यात रविवारी आयोजित करण्यात आलेला दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला.

साईभक्त महिला फाउंडेशन व साईभक्त सेवामंडळ यांनी पांडुरंग आमले यांच्या माध्यमातून आयोजित केलेला दीपोत्सव सोहळा सानपाडा सेक्टर 2 मधील खेळाच्या मैदानावर सांयकाळी 6 ते रात्री 10 यादरम्यान पार पडला.

या वेळी कोकण प्रांताचे परियोजनाप्रमुख सुरेश राणा, ठाणे विभागाचे समरसता प्रमुख कृष्णा बांदेकर उपस्थित होते. नवी मुंबई जिल्हा मातृशक्तीप्रमुख माया परमार हे उपस्थित होते. श्रीराम मंदीराची प्रतिकृती, सेल्फी पॉईंट, दिवाळी संध्या संगीत, भव्य श्री राम रांगोळी, विश्व हिन्दु परिषदेच्या व्याख्यांत्यांकडून व्याख्यान अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन पांडुरंग आमले यांनी केल्यामुळे स्थानिक रहीवाशांनी, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा महासचिव, आयटीसेल प्रदेश संयोजक सतीश निकम, सानपाडा-जुईनगर मंडल सचिव निलेश वर्पे, रमेश शेटे, शशी नायर, रूपेश मढवी, श्वेता मढवी, आज्ञा गव्हाणे, सुलोचना निंबाळकर, प्रतिभा पवार, संचिता जोएल,  दिशा केणी, ओपीजी टॉव्हरच्या पदाधिकारी महालक्ष्मी मॅडम, ब्रिगेन्झा मॅडम, रिटा सोनी, विजय सोनी, ज्येष्ठ कलावंत काजरोळकर काका, ज्येष्ठ नागरिक पत्की काका उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक पांडुरंग आमले, शारदा आमले यांच्यासह साईभक्त महिला फाउंडेशन, साईभक्त युवा मंडळ, भाजपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश नाईक यांनी केले तर उपस्थितांचे आभार पांडुरंग आमले यांनी मानले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply