नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
वडाळे तलावाशेजारी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महापालिकेच्या प्रभारी नगरसचिव यांना निवेदन दिले आहे.
नगरसेविका भोईर यांनी निवेदनात म्हटले की, पनवेल महापालिकेची स्थापना नव्याने झालेली आहे. श्री स्वामी विवेकानंद हे आपल्या पूर्ण भारताचे प्ररणास्थान व आजच्या युवकांचा उर्जास्त्रोत आहे. अशा या महान युगपुरुषाचे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोणत्याही भागामध्ये पुतळा नाही. 23 जानेवारी, 2020 रोजी विवेकानंदांची जयंती साजरी केली जाते, पण महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोठेही स्वामी विवेकानंदांचा पुतळा नसल्याने विविध संघटना व संस्था खंत व्यक्त करीत आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील वडाळे तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून या वडाळे तलावाच्या सुशोभिकरणाच्या कामादरम्यान या ठिकाणी खामी विवेकानंदांचा पुतळा उभारण्यात यावा याकरीता मी 9 ऑगस्ट 2018 रोजी आयुक्तांना याबाबतचे पत्र सादर केलेले आहे. जेणेकरून सर्व नागरिकांची संस्थांची व संघटनांची मागणी पूर्ण होणार आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीत सध्या सुरू असलेल्या वडाळे तलावाच्या सुशोभिकरणाच्या कामादरम्यान, स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारण्याबाबतचा विषय पनवेल महापालिकेच्या अगामी होणार्या महासभेमध्ये पटलावर घेऊन त्यावर कार्यवाही करण्यात यावी.