खोपोली : प्रतिनिधी
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये खोपोली नगरपालिकेस पुरस्कार प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 12) सर्व स्वच्छता कर्मचारी, संबंधित अधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.
शहरात स्वच्छता राखण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल नगराध्यक्षा सुमन अवसरमल यांनी सर्व स्वच्छता कर्मचारी व अधिकारी तसेच नगरसेवक व नागरिकांचे या वेळी आभार मानले. नगरसेवक मोहन औसरमल, गटनेते सुनील पाटील यांचीही या वेळी समयोचीत भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत सुर्वे यांनी केले. नगरपालिकेच्या आरोग्य सभापती अर्चना पाटील, महिला व बाल कल्याण सभापती निकिता पवार, नगरसेवक दिलीप जाधव, नितीन मोरे, अमोल जाधव, राजू गायकवाड, नगरसेविका माधवी रिटे, जिनि स्यॅम्युअल, अपर्णा मोरे यांच्यासह नगरपालिका अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. गजानन जाधव यांनी आभार मानले.