Breaking News

कोप्रोलीत सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे रहिवासी हैराण

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील कोप्रोली नाक्यालगत असलेल्या इमारतींमधील व्यावसायिक गाळे आणि भाडोत्र्यांच्या सांडपाण्याच्या निचर्‍याची व्यवस्था नाही. हे सांडपाणी यामुळे या इमारतींच्या पुढे राहत असलेल्या रस्त्याच्या दोन्ही दिशेला सोडले जाते. या समस्येमुळे येथील रहिवासी हैराण झाले असून ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे, अशी मागणी ते करीत आहेत.

दिवंगत मंडळ अधिकारी गजानन गाताडी यांच्या घराकडे जाणार्‍या या रहदारीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, येथील रहिवाशांना स्वतःच्या घराकडे मार्गक्रमण करण्यासाठी अक्षरशः नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. याबाबत कोप्रोली ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचअलका म्हात्रे व ग्रामविकास अधिकारी प्रविण खैरे यांच्याकडे या सांडपाण्याच्या दुर्गंधीमूळे त्रास होत असल्याबाबत मागील तीन महिन्यांपूर्वी येथील रहिवाशांनी तक्रार केली आहे.

कोप्रोली नाक्यावरील थाटण्यात आलेल्या इमारतींचे मालक रस्त्यात येणारे गटाराचे पाण्याचा निचर्‍याची व्यवस्था करण्यासाठी कोप्रोली ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी सूचना देऊनही हे सांडपाणी आजतागायत रस्त्यातच सोडले जाते. दोन्ही इमारत मालक एकमेकांवर ढकलाढकल करीत असल्याने या ठिकाणी गटारगंगा बनल्याने या रहिवासांना जंतूयुक्त गटाराच्या रस्त्यातून ये-जा करावी लागत आहे.

कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे स्वच्छतेसाठी अनेक प्रकारच्या मोहीम राबविल्या जात असताना या ठिकाणी जीव मुठीत घेऊन गटाराच्या रस्त्यातून चालणार्‍या कोप्रोली नाक्याजवळील रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोप्रोली ग्रामपंचायतीने संबंधितांस या गटाराच्या पाण्याच्या निचर्‍याची व्यवस्था करण्याची समज द्यावी. अन्यता साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होऊन येथील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply