Breaking News

धरमतर खाडीमध्ये अनधिकृतपणे वाळूउपसा करणार्यांवर जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई

एक सक्शन पंप, तीन बार्ज आणि 35 ब्रास वाळू जप्त

अलिबाग : जिमाका

धरमतर खाडीमध्ये अनधिकृत वाळू उपसा करणार्‍यांवर जिल्हा प्रशासनाच्या पथकाने धडक कारवाई करून एक सक्शन पंप, तीन बार्ज आणि 35 ब्रास वाळू जप्त केली आहे.

धरमतर खाडीमध्ये अनधिकृतपणे वाळू उपसा होत असल्याची खबर मिळताच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव  यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मीनल दळवी व त्यांच्या पथकाने रविवारी मध्यरात्री अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथील छापा टाकला. त्यावेळी तेथे अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणार्‍यांवर धडक कारवाई करून  या पथकाने तीन बार्ज, एक सक्शन पंप आणि 35 ब्रास वाळू जप्त केली.

अलिबागचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, तहसीलदार मीनल दळवी यांच्यासह निवासी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि कोतवाल  यांचा समावेश असलेल्या पथकाने ही धडक कारवाई केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply