मुंबई : एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी सेवा बंद आहे. कर्मचारी संप मागे घेण्याची चिन्हे दिसत नसल्याने अखेर शुक्रवारी (दि. 12) एसटी महामंडळाने एक निवेदन प्रसिद्ध करीत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन संपकर्यांना केले आहे, मात्र एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. एकीकडे एसटी महामंडळातर्फे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असले तरी आतापर्यंत आंदोलन करणार्या दोन हजारांच्या वर एसटी कर्मचार्यांना निलंबित करीत महामंडळाने कठोर कारवाई केली आहे, तर दुसरीकडे चर्चेची दारे खुली आहेत, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. असे असले तरी एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर कर्मचारी ठाम असल्याचे चित्र आहे.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …