Breaking News

जेएनपीटी बंदर आणि सिमाशुल्क विभागाच्या सुविधांबाबत निर्मला सितारामन यांच्याकडून आढावा

जेएनपीटी : रामप्रहर वृत्त
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी (दि. 25) जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)ला भेट दिली. त्यांनी बंदराच्या कामकाजाविषयी आणि सीमाशुल्क सुविधांच्या श्रेणीबद्दल सर्वसमावेशक माहितीचा आढावा घेतला. या वेळी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ उपस्थित होते.
बंदरातील त्यांच्या भेटीदरम्यान जेएनपीटीच्या अत्याधुनिक सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाला भेट दिली आणि सीपीपीमध्ये फॅक्टरी सीलबंद निर्यात कंटेनरसाठी सीमाशुल्क तपासणी सुविधा उभारण्याच्या पायाभरणीचे उद्घाटन केले. याशिवाय, केंद्रीय मंत्र्यांनी जेएनपीटी गॅझेबो व्ह्यू-पॉइंटवरून सर्व टर्मिनल्स आणि आसपासच्या पायाभूत सुविधांचा आढावा घेतला, तसेच समुद्राच्या बाजूने सर्व बंदर टर्मिनल्सचे लेआउट आणि पायाभूत सुविधांचे मूल्यमापन केले. या वेळी त्यांना व्यापार आणि वाणिज्य गतिमान करण्याच्या उद्देशाने जेएनपीटीच्या अनेक उपक्रमांची माहिती देण्यात आली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply