Breaking News

नवाब मलिकांना आणखी एक दणका

ईडीकडून मालमत्ता जप्त

मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. मलिकांच्या एकूण आठ मालमत्तांवर टाच आणण्यात आली आहे.
ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा, तीन फ्लॅट, गोवावाला कम्पाउंड येथील व्यावसायिक जागा, वांद्रे पश्चिमेतील दोन फ्लॅट आणि उस्मानाबादमधील 148 एकर जमिनीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता या नवाब मलिक यांच्या स्वत:च्या नावावर तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर आहेत. या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकांसोबत मिळून पैशांची अफरातफर (मनी लॉण्डरिंग) केल्याचा नवाब मलिक यांच्यावर आरोप असून याच प्रकरणात ते सध्या कोठडीत आहेत. याशिवाय मलिक यांच्यावर टेरर फंडिंगचाही आरोप आहे. दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत 300 कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि दाऊदची बहिण हसिना पारकर यांनी मिळून बळकावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply