देश-विदेशी पर्यटकांची लाडकी समजली जाणारी मिनीट्रेनने सतर्क पूर्ण लेले आहे. शतकोत्तर प्रवास करणार्या मिनीट्रेनचा नॅरोगेज ट्रक या मिनीट्रेनच पाया समजला जातो.हाच पाय आता आणखी मजबूत करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.दरम्यान, मिनिट्रेनच्या 21 किलोमीटर लांबीच्या मार्गावर आता माजुबत समजले जाणारे सिमेंटच्या साहाय्याने बनलेले स्लीपर टाकले जाणार असून नॅरोगेज ट्रक मजबूत करून मध्य रेल्वे नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनच मार्ग सुरक्षित करण्याचा प्रयत्न करू पाहत आहे. गेली तीन वर्षे सुरक्षेच्या कारणास्तव बंद असलेली मिनिट्रेनचा मार्ग सुरक्षित करण्यासाठी मध्य रेल्वेने एक पाऊल पुढे टाकण्यास सुरुवात केली आहे. नेरळ-माथेरान या 21 किलोमीटर लोखंडी स्लीपर काढून त्याजागी सिमेंटचे स्लीपर लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.मात्र हे काम घाटमार्गात असल्याने कर्मचार्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
महाराष्ट्रातील अबालवृद्धांची आवडती मिनिट्रेन ही काळानुरूप बदलत असताना दिसून येत आहे. सुरुवातीला कोळशाच्या इंधनावर चालणार्या इंजिनामधून मिनिट्रेन येत होती, हे इंजिन 1983 पर्यंत कार्यान्वित होते. त्यानंतर डिझेलवर चालणारे इंजिन या मार्गावर धावू लागले. या डिझेल इंजिनमध्ये अनेक बदल होत गेले. त्याच प्रमाणे स्लीपर मध्येही बदल होत आहेत.मिनिट्रेन सुरू झाली तेव्हा पासून लाकडी स्लीपरचा उपयोग होत होता. 80 च्या दशकात लाकडी स्लीपर काढून त्याजागी लोखंडी स्लीपर वापरात आली. दरम्यान पावसात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या, रुळाखालाची जमीन वाहून जाण्याच्या, भूस्खलन होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या. याच काळात मिनिट्रेन रुळावरून घसरण्याच्या घटना घडू लागल्या. त्यामुळे मध्य रेल्वेला सुरक्षेच्या कारणास्तव मिनिट्रेन बंद करावी लागली.
नेरळ-माथेरान-नेरळ हा नॅरोगेवज ट्रक मुंबईतील मिल मालक आदमजी पीरभॉय कुटुंबाने बनवला. माथेरानला जाण्यासाठी नॅरोगेज ट्रक बनविल्यास हा मार्ग त्यांनी भारतावर राज्य करणार्या ब्रिटिशांकडे दिला. त्या मार्गावर ब्रिटिशांनी मिनीट्रेन सुरु केली आणि आज त्या मिनीट्रेनला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सोनेरी क्षण समजला जात असून ब्रिटिश काळापासून या ठिकाणी मिनीट्रेन चालविली जात असून मागील काही वर्षात या ट्रेनच्या नॅरोगेज मार्गावर अनेक अडथळे येत आहेत. माथेरान येथील पर्जन्यमान लक्षात घेता दरवर्षी मिनीट्रेनच्या नॅरोगेज ट्रकच्या खालील माती वाहून जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यात मिनीट्रेनला सुरुवातीच्या काळात मातीचा भराव होता आणि त्याखाली लाकडी स्लीपर होते.कालांतराने त्या ठिकाणी खडी टाकून एक लोखंडी पट्टी असलेले स्लीपर 2000च्या दशकात टाकले गेले आणि त्यावेळी रूळ देखील बदलले गेले होते.असे अनेक उपाय करून देखील नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या ट्रॅकवर इंजिन रुळावरून घसरण्याचा समस्या सुटत नव्हत्या.
शेवटी भारताच्या इतर भागात जयप्रमाणे मध्य रेल्वेच्या बहुतेक सर्व ब्रॉडगेज मार्गांवर ज्याप्रमाणे लाकडी स्लीपर काढून सिमेंटचे स्लीपर बसवले गेले आहेत. त्यामुळ अपघाताचे प्रमाण देखील कमी झाले आहे. हे लक्षात घेऊन मध्य रेल्वे ने नेरळ-माथेरान मिनीट्रेन मार्गावर सिमेंटचे स्लीपर बसविण्याचे धोरण हाती घेतले आहे. त्यासाठी खास कमी वेगळ्या पद्धतीचे स्लीपर बनवले जात आहेत. कारण मिनीट्रेनचा ट्रक हा कमी रुंदीचा असल्याने ब्रॉडगेज मार्गावर रुळाखाली वापरले जाणारे मोठ्या खर्च स्लिपर बसविण्याची गरज नाही आणि म्हणून खास पाच फूट लांबी असलेले स्लिपर बनवले गेले आहेत. नेरळ येथे हे स्लीपर पोहचले असून मालवाहू गाडीच्या साहाय्याने ते स्लीपर नेरळ पासून माथेरान नॅरोगेज मार्गावर टाकले जात आहेत. विशेष पद्धतीचे सिमेंट स्लीपर यांच्यामुळे नेरळ-माथेरान मिनीट्रेनचा नॅरोगेज मार्ग आणखी मजबूत आणि सुरक्षित होणार आहे. स्लिपरच्या नवीनं खादी देखील टाकली जात आहे आणि त्यामुळे पावसाळयात मिनीट्रेनच्या मार्गावर पावसाच्या पाण्याचा धोका निर्माण होणार नाही अशी खात्री रेल्वेला आहे. हे स्लीपर सोलापूर आणि मध्यप्रदेश येथून बनवून आणण्यात आले आहेत.त्यासाठी तब्बल 37500 स्लीपर यांची गरज असून आतापर्यंत 2000 स्लीपर आणण्यात आले आहेत. यासाठी काही कोटी खर्च अपेक्षित आहे. माथेरान मिनिट्रेन 21 किलोमीटर घाटमार्गावर लोखंडी स्लीपर काढून सिमेंटचे स्लीपर लावण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम जो पर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मिनिट्रेन नेरळ-माथेरान मार्गावर अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे.
माथेरानचे निसर्गसंपदा…
माथेरान मधील 400 हेक्टरवरील माथेरान जंगल आणि माथेरानच्या माथ्यावरील 300 हेक्टर वरील असे एकूण 700 हेक्टरवर माथेरानचा अलौकिक ठेवा पसरलेला आहे. या निसर्गमुळेच माथेरानचे पर्यटन सतत बहरलेलं असते. इतके वर्षे माथेरानकरांनी हा अनमोल ठेवा जपलेला आहे. यापुढे चांगल्या पद्धतीने जपायचा आहे. यासाठी समस्त माथेरानकरांकडून सहकार्य मिळवून या माथेरानचा निसर्ग अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी वेगवेगळ्या मार्गातून जनजागृती केली जात आहे.
माथेरान या नावातच समृद्ध जंगल अधोरेखित आहे. त्यामुळे इतर पर्यंटनस्थळापेक्षा माथेरान हे अतिशय वेगळे पर्यटनस्थळ आहे.या जंगलातून चालणे याचा वेगळा अनुभव येथे आल्यावरच कळतो. येथील उंच झाडे ही फक्त माथेरान मध्येच दिसतात.त्यावर बागडणारे पक्षी, प्राणी यामुळे हे माथेरान आणखी खुलून दिसते. मात्र हे सर्व अबाधित राखण्यासाठी स्थानिकांसोबतच पर्यटकांनीही हे जंगल आपले समजून त्याची आपले पणाने जोपासना करायला पाहिजे, वेळीच वन वणवे रोखले पाहिजेत, वृक्ष लागवड सोबतच वृक्ष संवर्धनसाठी पुढे आले पाहिजे, वन्य जीवांचे रक्षण, वनाचे महत्व, पशुपक्षांचे महत्व याविषयी वन विभाग माथेरान व वन व्यवस्थापन समिती यांच्या मार्फत जनजागृती केली जात आहे. महत्वाचे म्हणजे आदिवासी वाड्यांमध्ये याची जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जात आहे असे वनपाल शंकर पवार यांनी सांगितले.
वृक्ष संपदा…
माथेरान मध्ये शेकडो वर्षांपासून असलेली हिरवीगार मोठमोठी वृक्षसंपदा हा माथेरानचा अलौकिक नैसर्गिक अनमोल ठेवा आहे. माथेरानच्या जंगलात जवळपास 150 प्रकारचे वृक्ष आढळतात. विविध जातीच्या वनस्पतीही आढळतात. हे जंगल सदाहरित व निमसदाहरित प्रकारात मोडले जाते. त्यामुळे जास्त पर्जन्यमानाला अनुकूल जांभूळ, पारजांभूळ,अंजन,पिसा,आंबा, उंबर, फणशी, बोकाडा, मळा, नांद्रुक, हिरडा, बेहडा, खैर, पांढरी इत्यादी झाडे दिसतात. तर याव्यतिरिक्त दिंडा, कारवी, नेचा या वनस्पती आढळतात.
माथेरान येथील प्राणी व पक्षी…
माथेरान मध्ये आढळणार्या प्राणीवर्गात सर्वात जास्त प्रमाण आहे ते माकडांचे. माकडांप्रमाणेच काळ्या तोंडाचे वानर, शेकरू, रानमांजर, रानडुक्कर, खार, भेकर, ससे, घोरपड, मुंगूस व विविध जातीचे सरपटणारे प्राणी आहेत. क्वचित बिबट्याचे दर्शन ही होते. इथल्या पक्षी सृष्टीत बर्याच प्रमाणावर बुलबुल, कुटूरुक, पावशा, दयाळ, लार्क, तांबट, किंगफिशर, राखी धनेश, रॉबिन, बॉर्बेट, सुतारपक्षी इत्यादी पक्षी जंगलात बागडताना दिसतात.
1) या जंगल संपत्तीत आग लागू नये तसेच शिकार होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी हे जंगल आपले समजून दक्षता घेतली पाहिजे.
2) या जंगलात कोणीही व्यक्ती शिकार अथवा आग लावताना दिसल्यास त्याची माहिती वन विभागाला तात्काळ कळवा
3) वनक्षेत्रामध्ये लागलेल्या आगीची परिस्थिती बघून ती विझवण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे वनक्षेत्राचे नुकसान कमी प्रमाणात होईल.
वन वणवे रोखण्यासाठी वनविभागा कडून हालचाली…
वन वणवे प्रामुख्याने नोव्हेंबर ते एप्रिल या महिन्यामध्ये लागतात.ते रोखण्यासाठी कर्जत तालुक्याच्या काही महत्वाच्या वनक्षेत्र भागामध्ये गावातील वन व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मार्फत गावामध्ये जनजागृती सुरू केली आहे. लोकांना मुख्यत्वे आदिवासी बांधवांना वनांचे महत्व याविषयी माहिती दिली जात आहे.वनवणव्यापासून होणार्या वनाच्या नुकसानीमुळे किती मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा र्हास होतो. याबाबत देखील सांगितले जात आहे. फायर ब्लॉअर च्या माध्यमातून आगीवर नियंत्रण कसे मिळवावे याबाबत सांगितले जात आहे.
वनरक्षक व वनपाल यांच्या बिटनुसार गस्त…
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे महाराष्ट्र वनखात्याचे ब्रीद वाक्य आहे.त्यानुसार वन विभागाच्या बरोबर शिकार आणि वन वणवे रोखण्यासाठी जनजागृती करणार आहोत.खास करून आदीवासी बांधावामध्ये याची गरज मोठ्या प्रमाणात आहे. माथेरानचे जंगल स्थानिकांनी अबाधित ठेवले आहे. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, वृक्षजतन, वृक्षतोड पडझड रोखणे, वन्य जीवांचे रक्षण, वृक्ष लागवड करणे, वणवा रोखणे, वणवा प्रतिबंधात्मक उपाय, वनांचे महत्व पटवून देणे, वन्य पशुपक्षांचे महत्व पटवून देणे, या मूलभूत कर्तव्यांसह स्वच्छ, सुंदर,सुशोभित,हरित माथेरान जतन व जोपासना करण्यासाठी वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश जाधव यांनी आवाहन केले आहे.
माथेरान मध्ये महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू दिसते, महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लु मॉरमॉन बागडताना दिसते,राज्यवृक्ष आंब्याची झाडे आहेत, महाराष्ट्राचे राज्यफुल जारूळ देखील आहे. वाघ नसला तरी बिबट्या हा प्राणी आहे तो क्वचित दृष्टीस पडतो.इतकं सारं असताना आपण स्थानिक, पर्यटक आणि वन विभाग यांनी एकत्र येऊन ही वनसंपदा अबाधित ठेवली पाहिजे. वन विभागाने लोकसहभागातून दस्तुरी येथील डाव्या बाजूला वृक्षलागवड व संवर्धन यशस्वी केले. लुईसा पॉईंट, गारबट पॉईंट, माउंट बेरी, पॅनोरमा पॉईंट येथेही जनतेच्या सहकार्यामुळे वृक्षारोपण आणि संवर्धन यशस्वी झाले. अशाच पद्धतीच सहकार्य वन वणवे व शिकारी रोखण्याचे काम करावे लागणार आहे. माथेरान मध्ये पाणी आणि पक्षी यांच्यासाठी पाणवठे आणि नैसर्गिक जलस्रोत पुनरुजीवन उपक्रमात आम्ही वन विभागाला सहकार्य करणार आहोत.आतापर्यंत वणवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही वणव्याच्या संवेदनशील भागात जाळरेषा काढल्या आहेत त्यामुळे वणवे रोखण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे.
-संतोष पेरणे, खबरबात