कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुका न्यायाधिकरण समिती आणि कर्जत बार असोसिएशनकडून लोकन्यायालय आयोजित केले होते. कर्जत येथील न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात तब्बल 447 प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले.
दरम्यान, कर्जत न्यायालयात अनेक वर्षे प्रलंबित असलेले दावे त्या दाव्यातील ज्येष्ठ पक्षकार आजारपणामुळे येऊ शकत नव्हते, अशा पक्षकारांना व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सामील करून घेत त्यांच्या संमतीने काही दवे निकाली काढले.
कर्जत येथील न्यायालयात न्यायाधीश मनोद टोकले यांच्या पुढाकाराने लोकन्यायालय भरविण्यात आले होते.न्यायधीश तोकले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकन्यायालयात कर्जत बार असोसिएशनचे अध्यक्ष योगेश देशमुख, ज्येष्ठ वकील राजेंद्र निगुडकर आणि डिमेलो हे व्यासपीठावर उपस्थित होते. कर्जत न्यायालयात सेवा देणारे 40 हून अधिक वकील आपल्या पक्षकारांसह हजर होते. या लोकन्यायालयात कर्जत न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी, सिव्हिल, क्रिमिनल, तसेच प्र-लिटिकेशन आदी प्रलंबित असलेल्या दाव्यांमधील पक्षकाराना निमंत्रित करण्यात आले होते.
लोकन्यायालयात सिव्हिल स्वरूपातील सहा; तर क्रिमिनल स्वरूपातील 23 दावे निकाली निघाले. त्याच वेळी न्यायालयात दावे सुरू असलेल्या 2792 केसेस पैकी 224 केसेसचे दावे निकाली काढण्यात या लोकन्यायालयाला यश आले.
प्र-लिटिकेशन असलेली 2589 पैकी 195 प्रकरणे दोन्ही पक्षकार यांच्या सामोपचारामुळे निकाली निघाली.