अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याचा वरिष्ठ गटाचा पुरुषांचा क्रिकेट संघ निवडण्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे 23 व 24 फेब्रुवारी रोजी पेण येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली. या निवड चाचणीतून निवडण्यात येणारा रायगडचा संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे घेण्यात येणार्या वरिष्ठ गट पुरुष आमंत्रितांच्या स्पर्धेत सहभागी होईल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा 1 मार्चपासून सुरू होणार आहे. रायगड जिल्ह्यातील रहिवासी खेळाडूंनाच या निवड चाचणीत भाग घेता येईल. निवड चाचणीसाठी खेळाडूंना सकाळी 8.30 वाजेपर्यंत स्वतःच्या कीटसह पांढर्याशुभ्र गणवेशात मैदानावर उपस्थित रहावे लागेल. प्रत्येक खेळाडूने येताना आपल्या आधार कार्डची रंगीत स्वसाक्षांकीत सत्यप्रत (मूळ प्रतीबरोबर) आणणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी अध्यक्ष चंद्रकांत मते (9822836442) यांच्याशी संपर्क साधावा.