पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाळा बँक घोटाळ्यासंबंधी लावण्यात आलेल्या बॅनरवर खुलासा करण्या ऐवजी ग्रामपंचायत निवडणुकीत पनवेल तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बॅनर वरून शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांचा फोटो गायब झाल्याने तालुक्यात कर्नाळा बँक घोटाळ्याचा धसकाच शेकाप उमेदवारांनी घेतल्याचे दिसून येत आहे . फोटो गायब केल्याने आमचे पैसे परत मिळतील का? असा सवाल महाविकास आघाडीच्या उमेदवारांना गावा गावात विचारण्यात येत आहे.
पनवेल तालुक्यात ग्रामापंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. भारतीय जनता पक्षा तर्फे आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरूणशेट भगत यांच्या नेतृत्वाखाली प्रचार सुरू आहे तर महाविकास आघाडी तर्फे आमदार बाळाराम पाटील आणि काशीनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचार सुरू आहे. कर्नाळा बँक घोटाळ्याचा फटका निवडणुकीत आपल्याला बसणार हे लक्षात आल्याने पाले बुद्रुक – कोळेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या शेकापच्या उमेदवारांनी आपल्या बॅनरवर महाविकास आघाडीच्या आघाडीच्या नेत्यांचे फोटो लावले मात्र माजी आमदार विवेक पाटील यांचा फोटो लावलेला नसल्याने कर्नाळा बँक घोटाळ्याचा धसका उमेदवारींनी घेतल्याची चर्चा मतदार संघात सुरू आहे.
कर्नाळा बँक घोटाळ्यामुळे ज्या गरीब शेतकरी आणि मजुरांचे पैसे बुडाले त्यांचे पैसे बॅनर वरील विवेक पाटलांचा फोटो काढल्याने मिळणार आहेत काय असा प्रश्न मतदार विचारात आहेत. 15 जानेवारीला होणार्या ग्रामपंचायत निवडणुकीत बॅनर वरील विवेक पाटलांचा फोटो काढल्याने पैसे बुडालेल्या मतदारांची मते मिळाणार की शेकापचा फुगा फुटणार हे दिसूनयेणार आहेच.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नावेखाडीत शिवमंदिर जीर्णोद्धार सोहळा आणि श्रींची पुनःप्रतिष्ठापना
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील नावेखाडी मधलापाडा येथे शिवमंदिर जीर्णोद्धार आणि श्रींची पुनःप्रतिष्ठापना सोहळा माजी …