पनवेल ः केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्यावर असणार आहेत. त्यामध्ये 19 फेब्रुवारीला मुंबई, तर 20 फेब्रुवारीला पनवेल येथील खांदा कॉलनीमधील रिसर्च सेंटरला भेट देणार आहेत. मंत्री महोदय 19 तारखेला मुंबईतील परेल येथील टाटा मेमोरियल सेंटरला भेट देऊन पाहणी व आढावा घेतील तसेच चेंबूर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, तर दुसर्या दिवशी पनवेलजवळील खांदा कॉलनीत असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अॅण्ड रिसर्च सेंटरला भेट देऊन विभागाचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते देवनार येथील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …