साडेचार लाखांचा माल हस्तगत
पनवेल : वार्ताहर
गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांच्याकडून घरातील उघडे दरवाजे, तसेच शटर आणि गर्दीच्या ठिकाणाहून मोबाइल चोरी करणार्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चार लाख 50 हजार रूपये किमतीचे एकुण 28 मोबाइल हस्तगत करून नवी मुंबई, पुणे आयुक्तालयातील एकुण 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने विशेष मोहिम राबवुन मोबाइल चोरी करणार्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळुन वेळीच प्रतिबंध करण्याबाबत आदेश दिले होते. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा, कक्ष 2, पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांचे मार्गदर्शनाखाली समांतर तपास करीत असताना सलमान इक्बाल मुकादम (वय 23) यास सापळा रचून पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडून 4,50,000 रुपये किमतीचे एकुण 28 मोबाइल हस्तगत केले आहेत.