कळंबोली : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर अरुण पाटील यांनी कळंबोली प्रभाग क्र. 7 मध्ये मोफत ई श्रम महा नोंदणी अभियान शनिवार (दि. 19) व रविवार (दि. 20) आयोजित केले होते. या कार्यक्रमात 270 नागरिकांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून या वेळी कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, नगरसेविका प्रमिला पाटील, नगरसेवक बबन मुकादम, जिल्हा सचिव अशोक मोटे, कळंबोली महिला अध्यक्ष मनिषा निकम, निता अधिकारी, श्वेता नगराळे, आबा घुटुकडे, संदीप भगत, दिलीप बिष्ट आदी उपस्थित होते, अशी माहिती कार्यालयीन चिटणीस जगदीश खंडेलवाल यांनी दिली.