Breaking News

मजगावच्या सुश्रिता दासची ’एम्स’मध्ये निवड

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यातील मजगाव येथील नाज अ‍ॅकॅडमी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची सुश्रीता उत्तमकुमार दास हिची पुढील शिक्षणासाठी गोरखपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये निवड झाली असून देशाच्या सर्वोच्च वैद्यकीय शिक्षण संस्थेत निवड होणारी रायगड जिल्ह्यातील ती पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. त्याबद्दल सुश्रीता दास आणि वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या अफ्फान परवेज पठाण या दोघांचा अ‍ॅकॅडमीतर्फे सत्कार करण्यात आला.

खडतर मेहनत घेतल्यास स्पर्धा परीक्षेतही असे यश मिळते. विद्यार्थ्यांनी सुश्रीता व अफ्फान यांचा आदर्श घेण्यासाठीच त्या दोघांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केल्याचे माजी मुख्याध्यापक प्रकाश मसाल यांनी सांगितले.

उदय खोत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नायब तहसीलदार अमित पुरी, सर एस. ए. हायस्कूलचे मुख्याध्यापक राणे, केंद्र प्रमुख बिलकिस फिरफिरे, डॉ. रुबा फिरफिरे, उजमा शहबाज तांडेल यांची भाषणे झाली. या वेळी सुश्रीता व अफ्फान यांचा त्यांच्या आई वडिलांसह शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सुश्रीता व अफ्फान यांनी सत्काराला उत्तर दिले.

मतिन हमदुले व दिलशाद दामाद यांनी सूत्रसंचालन केले. पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत म्हात्रे, नाज एज्युकेशन ट्रस्टचे संचालक शहबाज तांडेल, माजी सरपंच अजित कासार, चंद्रकांत कमाने, अ. रहमान कबले, अस्लम हलडे, हिलाल हलडे, मुख्याध्यापिका मेघा भंडारे आदी या वेळी उपस्थित होते. प्रीतम वाळंज यांनी आभार मानले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply