Breaking News

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश स्वामी यांची खालापूर न्यायालयास भेट

खोपोली : प्रतिनिधी

वकीलांनी जास्तीत जास्त दावे मध्यस्थीच्या माध्यमातून मिटवावेत, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश स्वामी यांनी खालापूर येथे केले.

लोक अदालत व कायदेशीर मार्गदर्शन याकरिता अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश स्वामी यांनी अलीकडेच खालापूर न्यायालयास भेट दिली. त्यावेळी खालापूर बार असोसिएशनने आयोजित केलेल्या वकिलांच्या सभेत न्या. स्वामी मार्गदर्शन करीत होेते. 12 मार्च रोजी होणार्‍या लोकअदालतमध्ये वकीलांनी मोठ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

तालुक्यात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे यशस्वी केल्याबद्दल अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश स्वामी यांनी खालापूर न्यायालयातील न्यायाधीश, वकील व न्यायालयीन कर्मचार्‍यांचे या वेळी कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. पद्मा पाटील यांनी केले. खालापूर दिवाणी न्या. वागळे, सह दिवाणी न्या. माने, न्या. सपकाळ मॅडम, अ‍ॅड. योगेश मानकवळे, अ‍ॅड. वसंत नामजोशी, अ‍ॅड. राजेंद्र येरुणकर, अ‍ॅड. विकास म्हात्रे यांच्यासह वकील बहुसंख्येने यावेळी  उपस्थित होता.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply