Breaking News

युक्रेनमध्ये अडकले रायगड जिल्ह्यातील 25 विद्यार्थी

अलिबाग : प्रतिनिधी

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भारतातील 12 हजारांपेक्षा जास्त लोक युक्रेनमध्ये असून त्यापैकी 1200च्यावर विद्यार्थी  आहेत. शिक्षणासाठी गेलेले रायगडमधील 25 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पालकांनी जिल्हा प्रशासनाला कळवली आहे.

युक्रेनवर रशियाने हल्ला केला आहे. युक्रेनमध्ये गेलेले अनेक भारतीय तेथे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या वतीने प्रत्येक राज्यातील जिल्हा प्रशासनाला युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले आहत.

शिक्षणासाठी गेलेले रायगडमधील 25 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पालकांनी जिल्हा प्रशासनाला कळवली आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. त्यामुळे तिथे सध्या दहशतीचे वातावरण आहे. येथील युद्धामुळे देशातील तब्बल 12 हजार नागरिक आणि विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत.

भारतीय नागरिकांना माय देशी परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी आता पालकांमधून जोर धरु लागली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासन परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून प्रयत्न करीत आहे. अडकलेल्या या विद्यार्थ्यांनी भारताकडे मदतीची मागणी केली आहे.

भारतात येण्यासाठी वाट पाहणारे विद्यार्थी

आर्यन पाटील (पेण झिराड), कोमल पाटील (पेण शिर्की बोरावे), अभिजित अशोक थोरात (खोपोली), साहिल म्हामूनकर (पनवेल लाडीवली), मुग्धा मोरे (महाड), पूर्वा पाटील (अलिबाग धेरंड), समीक्षा शिरसाट (पनवेल खारघर), यश कालबेरे (तळा), कल्पित मढवी (पेण), श्रद्धा पाटील (पेण), प्रेरणा दिघे (पेण), अद्वैत गाडे (पनवेल), विजया माने (कर्जत), श्रेयस टिळे (कर्जत), रुशवंती भोगले (पनवेल), साई मोरे (खालापूर), कुणाल कुवेसकर (पनवेल), शिल्पीता बोरे (पनवेल), अमर करंजीकर (माणगाव), तुराम बेरादर (बिरवाडी महाड), शोहिब पठाण (बिरवाडी महाड), सालवा धनसे (खोपोली), जयपाल भैरवसिंग परमार (मोहोपाडा, खालापूर), प्रचिती पवार (करंजाडे पनवेल), नहुष गौतम गायकवाड (नागोठणे) हे 25 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply