Breaking News

पनवेल मनपा क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रातील वाढत्या वायू आणि जल प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या बेलापूर (नवी मुंबई) येथील विभागीय कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 17) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नागरिक व विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रदूषणाच्या समस्या मांडत ठोस कारवाईची मागणी केली.
बैठकीस प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून विभागीय अधिकारी श्री. पडवळ आणि श्री. भोसले उपस्थित होते. या वेळी वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर 15 कंपन्या थेट सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. 200 कंपन्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत तसेच रात्री 8 ते सकाळी 6दरम्यान फिशिंग कंपन्यांवर बंदी घालण्याची मागणी महामंडळाने मान्य केली. याशिवाय प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणार्‍या बिल्डर्सवर कारवाई करीत प्रदूषण रोखण्यासाठी कामबंदीची नोटीस देण्याची मागणी करण्यात आली.
या बैठकीत भाजप उत्तर रायगड सचिव कीर्ती नवघरे, युवा नेते अमर उपाध्याय, हॅप्पी सिंग यांच्यासह नागरिक व विविध संस्थांचे प्रतिनिधींनी उपस्थित होते. प्रदूषण नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचे महामंडळाकडून या वेळी अधोरेखित करण्यात आले.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply