Breaking News

पेण दुरशेतजवळ दुचाकीला अपघात; एकाचा मृत्यू

पेण : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर पेण जवळील दुरशेत गावाच्या हद्दीत बुधवारी पहाटे दुचाकी घसरून अपघात झाला. या दुचाकी चालकाचा मृत्यू झाला तर त्याचा सहप्रवासी जखमी झाला.

निकेश लक्ष्मण दोरकडे (वय 28) व अकलेश जाधव (वय 27, रा. वडाळा, मुंबई) हे दोघे दापोली येथील फोटोग्राफीचे काम उरकून दुचाकी (एमएच-01,डीयु-1364) वरून वडाळा येथील आपल्या घरी येत होते. पेणजवळील दुरशेत गावाजवळ त्यांची दुचाकी घसरून ते दोघे रस्त्यावर आदळले. या अपघातात निकेश याचा मृत्यू झाला. अकलेश गंभीर जखमी. त्याला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघाताची नोंद दादर सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास उपनिरक्षक भऊड  करीत आहेत.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply