पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील कलमवाडी येथे स्वदेश फाउंडेशन व लोकवर्गणीतून नळ पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली आहे. या योजनेचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. या योजनेमुळे कलमवाडीतील ग्रामस्थांना नळाद्वारे शुद्धपाणी थेट घरापर्यंत मिळाले आहे.
या पाणीपुरवठा योजनेमुळे कलमवाडी ग्रामस्थांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागली आहे. तहसीलदार दिलीप रायण्णावार, सरपंच उमेश यादव, उपसरपंच योगेश सुरवकर, भाग्यश्री पाठारे, संतोष भोईर, स्वदेस फाउंडेशनचे दयानंद माने, ग्रामसेवक ए. टी. गोरड, रमेश पवार, कृष्णा वाघमारे, बबन वाघमारे, तुकाराम पवार, मंगेश यादव, गंगाराम सावंत, अंकेश पोंगडे, आशिष यादव, सतीश कदम, प्राची कदम, मनीषा पोंगड आदींसह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.
सिद्धेश्वर कलमवाडी स्वदेस गावविकास समिती, दयानंद माने, राकेश बारस्कर, प्रवीण पाटील यांनी ही योजना कार्यान्वित करण्यासाठी मेहनत घेतली. नंदू पवार, तुळशीराम पवार, मालू पवार, रवींद्र यादव, सुनील पोगडे, गणेश यादव, कृष्णा वाघमारे यांनी सहकार्य करून ही योजना पूर्णत्वास नेली.