कर्जत : बातमीदार
नेरळ शहरातील राम मंदिर व गंगानगर या भर नागरी वस्तीमधील दोन घरातील किमती वस्तू घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला.
नेरळच्या जुन्या बाजारपेठेतील राम मंदिराजवळ राहणारे हर्षद माणिकलाल शहा यांच्या घरी सायंकाळी सातच्या सुमारास चोरी झाली. घरातील तीन कपाटे फोडून चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेले आहेत.
नेरळ पूर्व परिसरात असलेल्या गंगानगर येथे अज्ञात चोरट्यांनी अनिल मसणे यांच्या घरात गॅलरीतून प्रवेश करत कपाटातील रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने चोरून नेले. या घटनांबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.