Breaking News

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत यश मिळविणार्‍या तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.2) गौरविण्यात आले, तर विधानसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजयी झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.
खांदा कॉलनीतील न्यू होरायजन पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह खारघरमधील संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य डॉ. अनुराग पांडे, उलवे नोडमधील एसएनजी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य डेबलिन रॉय आदी उपस्थित होते. मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
सुभाष पाटील यांना कोरियामध्ये इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या वेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जवळपास दोन हजार खेळाडू व पालक उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण; मान्यवरांची उपस्थिती

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलचे …

Leave a Reply