Breaking News

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण; मान्यवरांची उपस्थिती

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 1) मोठ्या उत्साहात झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, तर वर्षभरात प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, स्कूलचे चेअरमन परेश ठाकूर, शकुंतला ठाकूर, ‘रयत’चे रायगड विभागीय निरीक्षक मोहन कोंगरे, सहाय्यक निरीक्षक भानूदास खटावकर, स्कूलच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, स्कूल कमिटी सदस्य निलेश खारकर, कविता खारकर यांच्यासह शिक्षक, शिकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, उपस्थित होते. मान्यवरांनी बहुमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाची थीम मूल्योत्सव अशी होती. या अंतर्गत शैक्षणिक मूल्ये, शिस्तप्रियता, वक्तशीरपणा, स्वच्छतेचे महत्त्व, शाळेविषयी प्रेम, स्त्री-पुरुष समानता, मोठ्यांचा आदर, ध्येयनिश्चिती अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केली. शैक्षणिक वर्ष 2024-25मध्ये विविध विषयांत प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी; त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात, वक्तृत्व स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावणार्‍या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले, तर विशेष स्पर्धेत सहभागी झालेल्या पालकांचेही कौतुक केले गेले.

Check Also

एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही; आम्ही तुमच्या ठामपणे पाठीशी!

आमदार प्रशांत ठाकूर यांची बैठकीत ग्वाही पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल एसटी बसस्थानक ते रेल्वे स्टेशन …

Leave a Reply