Breaking News

…म्हणून मला समलैंगिक असल्याचा खुलासा करावा लागला -द्युती चंद

भुवनेश्वर : वृत्तसंस्था

देशाची स्टार धावपटू द्युती चंद सध्या तिच्या समलैंगिकतेबाबत चर्चेत आहे. द्युतीने नुकताच आपण समलैंगिक असल्याचा खुलासा केला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर क्रीडा जगतात खळबळ उडाली. आपली मोठी बहीण आपल्याला ब्लॅकमेल करत असल्यामुळेच आपल्याला हा खुलासा करावा लागला असल्याचे द्युतीने स्पष्ट केले आहे. द्युतीची बहीण तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडे 25 लाख रुपयांची मागणी करत होती, असे द्युतीचे म्हणणे आहे.

द्युतीने मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित करत याबाबत माहिती दिली. मी गेल्या तीन वर्षांपासून एका मुलीसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. जर आपल्याला पैसे दिले नाहीस, तर हे गुपित आपण फोडू अशी धमकी आपली मोठी बहीण सरस्वती सतत देत आहे, असे द्युतीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मी बहिणीला पैसे न दिल्याने तिच्या धमक्या अधिकच वाढल्या असेही द्युतीने सांगितले.

याबाबत द्युतीने दिलेल्या अधिक माहितीनुसार, आपण द्युतीचे गुपित मीडियासमोर उघड केले, तर द्युती आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही, असे म्हणत सरस्वती द्युतीला ब्लॅकमेल करण्याच्या प्रयत्नात होती. या प्रकरणावरून सरस्वतीने द्युतीला मारहाणही केली होती. त्यानंतर द्युतीने आपल्या बहिणीविरोधात पोलिसात तक्रारही केली होती. द्युती ही आजच्या घडीला भारताची सर्वात वेगवान धावपटू आहे. आपण समलैंगिक आहोत असा खुलासा करणारी ती भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे. या खुलाशानंतर क्रीडा जगत आणि लैंगिक हक्कांशी संबंधित कार्यकर्त्यांनी द्युतीच्या या खुलाशाचे स्वागत केले आहे, तर दुसरीकडे आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणार्‍या द्युतीला आपल्या कुटुंबाचा विरोध सहन करावा लागत आहे. द्युतीची आई अखुजी यांनी आपल्या मुलीच्या या निर्णयाचा विरोध केला आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply