Breaking News

‘दिशा’च्या हिरकणींनी सर केला कर्नाळा किल्ला

पनवेल : वार्ताहर

गड, किल्ले महाराष्ट्राला लाभलेली दुर्मिळ संपत्ती आहे. त्या संपत्तीच देखणं रूप, तिचा गोडवा ऐकण्यासाठी, अनुभवण्यासाठी दिशा व्यासपीठाच्या हिरकणींनी कर्नाळा ट्रेकिंगचे नियोजन महिला दिनानिमित्त केले होते.

किल्ल्यावर पोहचल्यावर दीपा खरात यांच्या शिवगर्जना व राजमाता जिजाऊच्या जयघोषाने पुन्हा एकदा किल्ला दुमदूमला.  विद्या मोहिते यांनी इतिहासातील महिलांची यशोगाथा व आपण त्यांचा आदर्श घेऊन कशाप्रकारे यशस्वी होऊ शकतो, यावर मार्गदर्शन केले. किल्ल्यावरून आजूबाजूचा निसर्गरम्य सुंदर परिसर, गड बांधणी, पाण्याचा संचय, रस्त्याची चढन, भिरभीरणारी फुलपाखर, विविध प्रकारचे पक्षी आणि पक्ष्यांचा किलबिलाट गर्द झाडी, वाळलेला पालापाचोळा, काही पानगळ झालेली झाडे, स्वच्छ आणि नितळ आकाश, जंगलाचे पारदर्शक प्रतिबिंब पाहून महिला दिन सार्थकी झाल्याचे दिशा व्यासपीठाच्या संस्थापक निलम आंधळे यांनी सांगितले.

तुंगा ट्रेकर्स व नोमॅड व्हेन्चर्स इंडियाचे विवेक पाटील व गणेश गजरे यांच्या मार्गदर्शनाने खुशी सावर्डेकर, कल्याणी ठाकरे, दीपा खरात, अनिता मागाडे, अरुणा शिरसाटे, अपर्णा कांबळे, रीना पवार, मंगल कानडे यांनी पारंपारिक वेशभू्षा परिधान करून किल्ला यशस्वीरित्या सर करण्यात आला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply