Breaking News

खोबरेल तेल भेसळीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

पनवेल : रामप्रहर वृत्त

सुट्टे खोबरेल तेल भेसळीसाठी चर्चेत असणे सुरूच आहे. या वेळी कोचिन ऑईल मर्चंट्स असोसिएशनने (सीओएमए) सुट्ट्या खोबरेल तेलातील भेसळीचा हा मुद्दा प्रकाशात आणला आहे. सीओएमएचे अध्यक्ष म्हणाले, खोबरेल तेलात सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन पद्धतीने काढलेल्या तेलाची मोठ्या प्रमाणावर भेसळ करण्यात येत आहे. सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन युनिट्स औद्योगिक कारणासाठी तेल आयात करत आहेत आणि नंतर एक्स्ट्रॅक्ट केलेले तेल सुट्ट्या खोबरेल तेलात स्वस्त बनवण्यासाठी मिसळत आहेत.

असे भेसळयुक्त तेल वापरासाठी योग्य आहे का? असा प्रश्न अध्यक्षांनी उपस्थित केला. अनेक वर्षे, औद्योगिक तेल सुट्ट्या खोबरेल तेलात मिसळण्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. या तेलाच्या वापरामुळे लोकांमध्ये केस गळणे आणि जळजळ होणे यापासून पक्षाघात ते कर्करोगापर्यंतचे परिणाम झालेले दिसून येतात. वास्तविक, सरकारने या चिंतांमुळेच खाद्य तेल सुट्टे विकण्यावर बंदी घातली आहे. गेल्या वर्षी केरळ अन्न सुरक्षा विभागाने भेसळयुक्त खोबरेल तेल विकणार्‍या 74 विक्रेत्यांवर बंदी घातली आणि गेल्याच आठवड्यात, अजून 14 लोकांवर बंदी घालण्यात आली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply