Breaking News

लसीकरणात भारताचा महाविक्रम; कोरोना प्रतिबंधक 100 कोटी लसींचा टप्पा पार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

कोविडविरुद्ध लसीकरण मोहिमेत देशाने गुरुवारी (दि. 21) भारताने एक इतिहास रचला आहे. देशात कोविड लसीकरणात 100 कोटी डोस देण्याचे काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाचे हे यश आहे, असे म्हटले आहे. इतक्या जलद गतीने लसीकरणाचा 100 कोटींचा आकडा गाठणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. गुरुवारी हा टप्पा पूर्ण होताच लाऊड स्पीकर्सद्वारे विमान, जहाज, मेट्रो, रेल्वे अशा सार्वजनिक ठिकाणी याबद्दल उद्घोषणा करण्यात आली. हा क्षण ‘उल्लेखनीय यश’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या यशाबद्दल लाल किल्ल्यावर सर्वांत मोठा खादीचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. लसींच्या डोसची संख्या 100 कोटी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी राम मनोहर लोहिया रुग्णालयात पोहचले होते. तिथे त्यांनी रुग्णालय अधिकार्‍यांशी संवाद साधला.

पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 100 कोटींच्या लसीकरणाचा टप्पा पार केल्यानंतर या संदर्भात ट्वीटही केले आहे. भारताने इतिहास रचला आहे. आम्ही भारतीय विज्ञान, उद्यम आणि 130 कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेच्या विजयाचे साक्षीदार आहोत. 100 कोटी लसीकरण पार केल्याबद्दल भारताचे अभिनंदन. आमच्या डॉक्टर, परिचारिका आणि प्रत्येकाने ज्यांनी ही कामगिरी साध्य करण्यासाठी काम केले त्यांचे आभार, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply