उरण ः वार्ताहर
उरण व पनवेल परिसरात विविध कार्यक्रमांनी स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला. तर काही ठिकाणी सामाजिक उपक्रम आयोजित करून महिला दिन साजरा करण्यात आला. उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम रविवारी (दि. 6) रोजी संपन्न झाला.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आहारतज्ज्ञ डॉ. विणा यार्दी, विशेष अतिथी माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे व निता बालदी यांच्या उपस्थित होत्या. प्रमुख मान्यवरांसमवेत अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक पटांगणात प्रवेश करताच महिला वर्गाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या गजराने वातावरण दुमदुमून गेले. त्यानंतर निवेदिका गौरी मंत्री यांनी आपल्या शब्दसुमनांनी पाहुण्यांचे स्वागत केले. गानसम्राज्ञी भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांना समर्पित केलेला हा सांस्कृतिक कार्यक्रम दिदिंना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यानंतर कार्यक्रमात निमंत्रित केलेल्या सत्कारमूर्ती न्हावा शेवा पोलीस स्टेशन महिला पोलीस हवालदार मानसी तांबोळी, उरण महिला पोलीस हवालदार रचना रविंद्र ठाकूर, मोरा सागरी पोलीस स्टेशन सचिता म्हात्रे, कांचन मंदार आसरकर, अश्विनी धोत्रे सामाजिक कार्यकर्त्या यांना गौरविण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा गौरी देशपांडे, सचिव निशा शिरधनकर, खजिनदार अॅड. वर्षा पाठारे, उपाध्यक्षा कल्याणी दुखंडे, कार्याध्यक्षा डॉ. अनिता कोळी, सदस्या दीपा शिंदे, सीमा घरात, शुभांगी शिंदे, गौरी मंत्री, नाहीदा ठाकूर, दीपा मुकादम, प्रमिला गाडे, अफशा मुकरी, प्रगती थळी, संगीता पवार, कल्पना तोमर, जोष्णा येरुणकर, संध्याराणी ओहोळ, शिल्पा शेडगे, गीता पवार, सुप्रिया म्हात्रे, विद्या म्हात्रे, दर्शना नायीक, सुषमा काळे, मोनिका चौफेर, तृप्ती भोईर, नेहा गोडे, अर्चना पटेल, रिद्धी पारेख, स्नेहल म्हात्रे, निर्मला भानुषाली, अश्विनी धोत्रे, प्रियांका पाटील यांचे सहकार्य लाभले.