Breaking News

कर्जत रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाच्या गर्डरचा अडथळा दूर

कर्जत : बातमीदार

मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकातील फलाट दोनवरील पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे लवकरच पूर्ण होऊन हा पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला होणार आहे. कर्जत रेल्वेस्थानकात फलाट दोनवर आठ वर्षांपूर्वी पादचारी पूल बांधण्यात आला होता, मात्र तो पुणे एन्डकडे असल्याने कर्जत स्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी त्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी लोकलच्या बाजूने पादचारी पूल बनविण्यात आला आणि नंतर आठ वर्षांपूर्वी उभारलेल्या जुन्या पादचारी पूलाचा जिना तोडण्यात आला. तरीदेखील फलाट दोनवरून फलाट क्रमांक तीनच्या बाहेर पडण्यासाठी पादचारी पूल उभारण्यात येणार होता. मात्र या नियोजित पादचारी पुलाचे काम गेल्या चार वर्षापासून थांबले होते. या पुलाचे गर्डर टाकण्याचे काम आता पूर्ण झाले असून, सध्या या पुलाच्या दोन्ही बाजू जोडण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर हा पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply