मुरूड : प्रतिनिधी
एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत अन्नदा-पोषण आणि विकास कृती संघटनेतर्फे व स्वामीराज फाउंडेशनच्या माध्यमातून मुरूड तालुक्यातील विविध अंगणवाडी केंद्रातील सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील कुपोषित आदिवासी बालकांना पाच किलोच्या 343 पोषण पोटल्यांचे वाटप करण्यात आले. मुरूड पंचायत समितीच्या कै. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात झालेल्या या कार्याक्रमाला तहसीलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, गटविकास अधिकारी सुभाष वाणी, विस्तार अधिकारी संजय शेडगे, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रविण पाटील, अन्नदा-पोषण आणि विकास कृती संघटनेचे दिपेश गावड़े, स्वामीराज फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश माने, संजीवनी माने, सुप्रिया पाशीलकर, कविता कदम, शुभांगी कोतवाल, सुवर्णा चांदोरकर, राजू म्हशीलकर यांच्यासह सर्व आंगणवाडी सेविका व आदिवासी महिला उपस्थित होत्या. तहसीलदार रोहन शिंदे यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.