Breaking News

माणगाव बाजारपेठेत स्वच्छता मोहीम; व्यापारी असोसिएशनने राबविले अभियान

माणगाव : प्रतिनिधी

स्वच्छ माणगाव, सुंदर माणगाव  संकल्पना नजरेसमोर ठेवून येथील व्यापारी असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि. 25) सकाळी माणगाव शहरात स्वच्छता अभियान  राबविण्यात आले. या वेळी प्रामुख्याने बाजारपेठेतील रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. माणगाव व्यापारी असोसिएशन तर्फे शुक्रवारी सकाळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन एसटी बस स्थानकापासून स्वच्छता अभियानास सुरूवात करण्यात आली.  नगरपंचायतीच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमते माणगाव बाजारपेठेतील मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा असलेला कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत व्यापारी असोसिएशनचे संस्थापक लक्ष्मण दळवी,  अध्यक्ष गिरीश वडके, सचिन शरद देसाई, रमेश जैन, अरुण क्षीरसागर, प्रसाद धारिया, ललित ओसवाल, विक्रांत गांधी, अशोक धारिया, जयवंत शेट, संतोष मेथा, संतोष दोशी, निलेश मेथा, मांगिलाल कुमावत, संदीप मेथा, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, स्वच्छता सभापती अजित तारलेकर,  महिला व बालकल्याण समिती सभापती शर्मिला सुर्वे यांच्यासह व्यापारी, नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी  व नागरिक सहभागी झाले होते.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply