उलवे नोड ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी विद्यालयाचे दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी (दि.3) उत्साहात साजरे झाले. या वेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना गौरविले.
‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्नेहसंमेलनाला कामगार नेते महेंद्र घरत, आरटीओचे अधिकारी अनिल पाटील, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शकुंतला ठाकूर, सीबीएससी स्कूल कमिटी चेअरमन तथा पनवेल महापालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर, मराठी मीडियम स्कूल कमिटीचे चेअरमन शरद खारकर, संस्थेचे रायगड विभागीय अधिकारी रोहिदास ठाकूर, मोरू नारायण म्हात्रे व तुकाराम नारायण घरत महाविद्यालय आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे चेअरमन भार्गव ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, माजी पं.स.सदस्य रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजू खारकर आदी उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.