पनवेल : वार्ताहर
कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अमरदीप बालविकास फाउंडेशनच्या वतीने तळागाळातील कामगारांच्या सन्मानार्थ हास्य, गीत, नृत्य आणि नाट्य यांचा अभूतपूर्व संगम आणि महाराष्ट्राच्या लोककलेवर आधारित ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा कार्यक्रम नुकताच शासकीय अध्यापक महाविद्यालय, पनवेल येथे मोठ्या उत्साहात झाला.
या कार्यक्रमाची संकल्पना नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एन. डी. खान यांचे होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक विभागाचे कक्ष अधिकारी बाळासाहेब सावंत, इआल बिजनेस स्कूलच्या संचालिका अंशुल शर्मा, ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचे राज्यसचिव संजीवकुमार, आशा की किरन या संस्थेचे संचालक बशीर कुरेशी, दलितमित्र सुदेश दळवी, समाजसेवक प्रमित सरन, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, विवेक ताम्हनकर, महादेव गायकर, रामदास धोत्रे, संजय येशी, रमेश शिंदे, बाबासाहेब शिंदे व नुसरतजहा सागवेकर आदी मान्यवरांना लोकगौरव पुरस्कार व श्रमरत्न सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले, गर्जा महाराष्ट्र या कार्यक्रमात आनंदाचे डोही, जय जय महाराष्ट्र माझा एकापेक्षा एक सरस गीते प्रसिद्ध गायक गणेश म्हात्रे व सहकारी यांनी सादर करून रसिकांची मने जिंकली. स्वप्नील चव्हाण यांच्या माऊथ ऑर्गनने रसिक भारावून गेले. यशराज कलामंचच्या कलाकारांनी लोकनृत्याचे अभ्यासक विवेक ताम्हनकर यांचे नृत्य दिग्दर्शन असलेला वासुदेव आला अहो, राजे हो हा पोवाडा, महाराष्ट्राची शान लावणी नृत्य, जेजुरीच्या खंडेराया अशी नृत्य सादर करण्यात करून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. दीपक कदम यांनी साकारलेल्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेने रसिकजन आवाक् झाले. अक्कलकोट अॅकॅडमीच्या सार्थक व सर्वेश यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रीनिवास काजरेकर यांनी सादर केलेल्या नांदी व भारुडाने कार्यक्रमाची उंची गाठली. पायल डान्स अॅकॅडमीची विद्यार्थिनी संस्कृती शिर्के हिने नादखुळा लावणी अतिशय सुंदररित्या सादर केली. शिक्षक जितेंद्र ठाकूर यांनी कामगार दिनावर आपल्या ओघवत्या शैलीत कामगारांची कर्तव्ये, हक्क आणि कामगाराची सद्य परिस्थिती यावर प्रकाशझोत टाकला.
या कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेचे कामगार, इतर कामगार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, सिडको अधिकारी, पोलीस अधिकारी यांना फेटा आणि गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सन्मानित करण्यात आलेल्यांमध्ये पोलीस अधिकारी चंद्रकांत पवार, कामगार नेते धनराज पाटील, सिडको अधिकारी रचना म्हात्रे यांचा समावेश होता. सूत्रसंचालन एच. एन. पाटील आणि वर्षा पाचभाई यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संस्थेच्या सचिव सलमा खान, रमेश चव्हाण, राजकुमार ताकमोगे, जेबा करानेकर, ऋषिकेश लादे, दिनकर दळवी, निजाम शेख, स्वप्नील भांबुरे, अस्लम नाईक, मिलिंद, सचिन कदम, खारपाटील, छाया अक्कलकोटे, रवींद्र गोविंद, मजुंषा कदम, ललिता गोविंद, चित्रा भगत यांनी विशेष मेहनत घेतली.