Breaking News

गाडीने घेतला अचानक पेट; जीवितहानी टळली

पनवेल : वार्ताहर

कर्जत-चौक राज्य मार्गावरून मुंबईचे रमेश ताज हे आपल्या कुटुंबासह त्यांच्या फोर इनडोअर गाडीने कर्जतकडे निघाले असताना त्यांची कार एनडी स्टुडिओजवळ आली असता गाडीने अचानक पेट घेतला. या वेळी दैव बलवत्तर म्हणून गाडी चालकाच्या प्रसंगावधानाने गाडीतील सर्वांचे जीव वाचले, परंतु लागलेल्या आगीत गाडी भस्मसात झाली.

मुंबईहून निघालेले ताज कुटुंबीय आपल्या चारचाकी वाहनातून कर्जतच्या दिशेने जात असताना त्यांची गाडी हातनोलीपुढे एनडी स्टुडिओजवळ आली असताना गाडीने अचानक पेट घेतला. या वेळी वाहनचालकाने प्रसंगावधान दाखवून गाडीतील प्रवाशांना खाली उतरवले. या वेळी वाहनाला आग लागून डोंब उसळल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या वेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. कर्जत अग्निशन दलाचे नौजवान चालक दिनेश हिरे, सुनील सुर्वे, प्रदीप हिरे यांनी घटनास्थळाला भेट दिली व अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग विझवली. या वेळी काही वेळ वाहतूक थांबविण्यात आली होती, परंतु या आगीत वाहनाचे जळून पूर्णता नुकसान झाल्याचे दिसून आले.

Check Also

परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक …

Leave a Reply