पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका मुख्यालयात सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्युत मंडळाच्या (एमएसईबी) अधिकार्यांसोबत विविध समस्यांबाबत शुक्रवारी (दि. 8) बैठक झाली. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी विजेच्या समस्या सोडविण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या.
या बैठकीला नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका रूचिता लोंढे, शहर अभियंता संजय कटेकर, श्री. जगताप, प्रीतम पाटील, श्री. कदम, एमएसईबीचे श्री. सरोदे आदी उपस्थित होते.
पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी धोकादायक स्थितीत असलेले विद्युत पोल तसेच वीजपुरवठ्यासंदर्भातील विविध समस्यांबाबत या वेळी सविस्तर चर्चा करण्यात झाली.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …