Breaking News

कितीही आंदोलने झाली तरी कायद्याची अंमलबजावणी होणारच – रविशंकर प्रसाद

मुंबई : प्रतिनिधी

नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात दिल्ली, पाटणा, लखनौ, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, मुंबईमध्ये आंदोलने करण्यात येत आहेत. ठिकठिकाणी तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडताहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी नागरिकत्व विधेयकावरून सुरू असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. कितीही आंदोलने झाली तरी कायद्याची अंमलबजावणी होणार असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सगळ्या शंका दूर करण्यात येतील, तसेच विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यास तयार आहोत, मात्र तुकडे तुकडे गँगशी चर्चा करणार नसल्याचेही त्यांनी ठणकावले आहे. रविशंकर प्रसाद म्हणाले की, आम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहोत, मात्र तुकडे तुकडे गँग, शहरी नक्षलवादी किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी चर्चा करणार नाही. ही आंदोलने आमच्या राजकीय विरोधकांकडून पुरस्कृत आहेत. नागरिकत्व कायदा कोणत्याही भारतीय नागरिकाला लागू होत नाही. यामध्ये भारतीय मुस्लिमांचाही समावेश आहे. त्यांना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. ते भारताचे नागरिक म्हणून कायम राहतील.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply