पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाडदिवसानिमित्त धाकटा खांदा येथे दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि श्री गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळेतील नवीन वर्ग खोल्यांचा लोकार्पण सोहळा शनिवारी आयोजीत करण्यात आला होता. हे कार्यक्रम भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती मनोहर म्हात्रे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा गुणगौरव, छत्री वाटप आणि नवीन वर्ग खोल्यांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी भाजपे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अजय बहिरा, मुकीत काझी, तेजस कांडपिळे, महेंद्र कावळे, माजी प्रभाग समिती सभापती हेमलत्ता म्हात्रे, पनवेल शहर चिटणीस गणेश पवार, मोतीलाल कोळी, रायगड जिल्हा कार्यकारणी सदस्य भीमराव पोवार, युवा नेते सतीश पाटील, जिल्हा सदस्य परेश पाटील, खांदा कॉलनी युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक भोपी, सुरेश टेंबे, रवींद्र डोंगरे, प्रवीण पाटील, नितेश म्हात्रे, अर्जुन भगत, विनोद भगत, नरेश म्हात्रे, रोशन भगत आदी उपस्थित होते.