भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील कानपोली येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून अंतर्गत नाल्यांची व 50 मीटरच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. हे काम आठ लाख रुपयांची निधी वापरून करण्यात येत आहे. या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 18) करण्यात आले.
या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, वावंजे विभागीय अध्यक्ष प्रकाश खैरे, एकनाथ देशेकर, बाळकृष्णा पाटील, राजेश पाटील, आत्माराम खानावकर, उमेश पाटील, संतोष पाटील, सचिन जोशी, निवृत्ती पाटील, अभिमन्यू पाटील, प्रल्हाद सालुंखे, बामा उघाडा, शनिवार चौधरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षातर्फे पनवेल तालुक्यात विकासकामांचा झंझावात सुरू आहे. शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी नागरिकांना उत्तर सोयीसुविधा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मेहनत घेत असतात. त्यामुळे नागरिक वेळोवेळी आभार मानून भाजपच्या या मेहनतीला कौतुकांची थाप देत असतात.