Breaking News

भगवान बिरसा मुंडा चषक क्रिकेट स्पर्धा

भाजप नेते संजय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
महान जनजाती स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती व राष्ट्रीय जनजाती गौरव दिन पनवेल तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा होत आहे. त्या अंतर्गत वनवासी कल्याण आश्रम आणि पनवेल तालुका भारतीय जनता पक्ष यांच्या माध्यमातून तसेच भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सौजन्याने भगवान बिरसा मुंडा चषक 2022 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 18) झाले.
गाढेश्वर मंदिर येथील भव्य मैदानात खेळल्या जात असलेल्या या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला वाजे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश भालेकर, दुंदरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच किशोर पाटील, वाजे ग्रामपंचायतीचे सदस्य पद्माकर वाघ, मालडुंगे ग्रामपंचायत सदस्य जनार्दन निरगुडा, दुंदरेचे माजी उपसरपंच शांताराम चौधरी, भाजप ज्येेष्ठ कार्यकर्ते विष्णू चौधरी, युवा कार्यकर्ते विकास भगत, गणेश पाटील, दिलीप पाटील, शत्रुघ्न उसाटकर यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रिकेटपटू आणि दर्शक उपस्थित होते. ही स्पर्धा 20 नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply