Breaking News

मागण्यांची पुर्तता करा, अन्यथा कामे बंद पाडू

 जासई येथील शेतकर्‍यांचे सिडकोला निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त

येत्या पंधरा दिवसांच्या आत मागण्यांची पुर्तता करावी अन्यथा नाईलाजाने सर्व शेतकरी व ग्रामस्थ सिडकोची चालू असलेली सर्व कामे बंद पाडू असा इशारा जासई गावातील शेतकर्‍यांनी सिडकोला दिला आहे. शेतकर्‍यांनी मागण्यांसंदर्भात न्हावा शिवडी सागरी सेतू संघटनेच्या वतीने (ग्रामस्थ मंडळ संघर्ष समिती, जासई) सिडकोला निवेदन देण्यात आले आहे.

सिडकोच्या प्रकल्पाची गावाच्या आजू बाजूला बरीच कामे चालू आहेत. ही कामे चालू करून बराच कालावधी झाला तरी येथील शेतकर्‍यांचे, गामस्थांचे प्रश्न तसेच पडून आहेत. येत्या पंधरा दिवसांच्या आत मागण्यांची पुर्तता करावी अन्यथा नाईलाजाने सर्व शेतकरी व ग्रामस्थ सिडकोची चालू असलेली सर्व कामे बंद करू  आणि ही कामे बंद झाल्याने जे काही नुकसान होईल त्याला सर्वस्व सिडको प्रशासन व राज्य सरकार जबाबदार असाल, असे समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

या संदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी  यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, शेतकर्‍यांची जी जमिन संपादीत करणार आहात. त्या मोबदल्यात दिला जाणार्‍या विकसित मुखंडाची जागा आणि कालावधी लिहून द्यावा. तसेच भूखंड मिळण्याचा डेव्हलपमेंट चार्ज रद्द करावा. गरजेपोटी बांधलेली सर्व घरे नियमित करावीत आणि वाढीव गावठाण घोषित करावे. तसेच 19.12. 2014 च्या एमटीएचएलच्या कराराची अंमलबजावणी करावी. सिडकोकडून आलेल्या जमिन संपादीत करण्याच्या नोटीसांवर ज्यांनी हरकत घेतली आहे त्यांच्या नोटीसा रदद् कराव्यात. ज्यांची जमिन संपादीत केली जाईल त्या जमिनीच्या सातबार्‍यावर ज्यांची नावे आहेत त्या सर्वांना प्रकल्पग्रस्ताचे दाखले कोणतीही नुकसान भरपाई न देता काम सुरू कली आहेत ती थांबवावी. प्रथम नुकसान भरपाई शेतकर्‍यांना द्यावी नंतर कामे चालू करावीत.

तसेच प्रकल्पामध्ये स्थानिकांनाच नोकर्‍या व व्यवसाय मिळावेत. मैदान, समाजमंदिर, स्मशानभूमी, दफनभूमी आणि पिण्याच्या पाण्याची टाकी यासाठी जागा उपलब्ध करावी.  जासई ग्रामपंचायतसाठी विकासनिधी मिळावा. पावसाळयात 135 घरांमध्ये पाणी शिरले तरी नुकसान भरपाई मिळावी आणि गटाराची कामे व्हावीत. उरण-बेलापूर रेल्वे मार्गावर जासई रेल्वे स्टेशन करण्यात यावा. श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.  बा. पाटील ज्यु. कॉलेज जासईसाठी खेळाचे मैदान मिळावे. तसेच हुतात्मा भवन जासईचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशा मागण्या या निवेदनात नमूद केल्या आहेत.

निवेदन देतना समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी सभापती नरेश घरत, धर्मा पाटील, यशवंत घरत, जितेंद्र पाटील उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply