Breaking News

पनवेल रेल्वेस्थानकामध्ये प्रवाशांसाठी आसन व्यवस्था

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सुविधांचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त

सामाजीक उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर असलेल्या इनरव्हील क्लबच्या माध्यमातून पनवेल रेल्वेस्थानकामध्ये प्रवाशांना बसण्यासाठी लोखंडी सोफा, खुर्च्या देण्यात आल्या आहेत. या सुविधांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 17) लोकार्पण झाले. या वेळी त्यांनी इनरव्हील क्लबच्या माध्यमातून राबवण्यात येणार्‍या उपक्रमांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, तसेच वर्षा प्रशांत ठाकूर, इनरव्हील क्लबचे डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोष सिंग, सेक्रेटरी शैलजा खाडिलकर, रेल्वे स्टेशनचे मॅनेजर जगदीश मीना, प्रवासी संघाचे अध्यक्ष श्री. ठाकरे, सेक्रेटरी श्रीकांत बापट, यांच्यासह रेल्वेचे अधिकारी आणि इनर व्हिल क्लबचे सदस्यच्या सभासद उपस्थित होत्या.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट सुलभा निंबाळकर, सेक्रेटरी श्वेता वारंगे, जयु हळदीपूरकर, मीनल टिपणीस अक्षता खोत, माधवी नेमन आणि गौतम अगरवाल यांनी मेहनत घेतली. दरम्यान, या वेळी क्लबच्या वतीने रेल्वेचे नवीन वेळापत्रक तयार करुन स्थानकामध्ये लावण्यात आले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply