पोलादपूर : प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पोलादपूर नगरपंचायतीच्या भाजप नगरसेविका अंकिता जांभळेकर-निकम यांच्यावतीने रविवारी (दि. 5) वार्ड क्रमांक 14 मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक भान राखून विविध उपक्रम राबविण्याचे काम करून आपण जनतेच्या सोयी-सुविधांसाठीही लढणार असल्याचे या वेळी नगरसेविका अंकिता जांभळेकर यांनी सांगितले. प्रभागातील प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावून त्याची संगोपन करावे, असे आवाहन नगरसेविका जांभळेकर-निकम यांनी या वेळी केले. भारतीय जनता युवा मोर्चा रायगड जिल्हा चिटणीस महेश निकम आणि सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता शेठ यांच्यासह नागरिक या वेळी वृक्षारोपण करण्यासाठी उपस्थित होते.