Breaking News

भारताकडून सातव्यांदा पाकचा धुव्वा

मॅनचेस्टर : वृत्तसंस्था

वर्ल्डकपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा तब्बल 89 रननी पराभव झाला आहे. या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला विजयासाठी 337 धावांचं आव्हान दिलं होतं, पण पाऊस पडल्याने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे पाकिस्तानला विजयासाठी 40 ओव्हरमध्ये 302 धावांचं आव्हान मिळालं, पण पाकिस्तानला 212/6 एवढीच मजल मारता आली.

भारताकडून विजय शंकर, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. भारताने ठेवलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला सुरुवातीलाच पहिला धक्का बसला. विजय शंकरने इमाम-उल-हकला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर फकर जमान आणि बाबर आझम यांनी पाकिस्तानच्या इनिंगला आकार द्यायला सुरुवात केली. फकर जमानने 62 रन तर बाबर आजमने 48 रनची खेळी केली. या दोघांची विकेट गेल्यानंतर, मात्र पाकिस्तानला भारताच्या बॉलरनी वारंवार झटके दिले.

या विजयाबरोबरच भारताचं पाकिस्तानविरुद्धचं वर्ल्डकपमधलं विजयाचं रेकॉर्ड कायम राहिलं आहे. वर्ल्डकपमधला भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा सात मॅचमधला सातवा विजय आहे. याआधी 1992, 1996, 1999, 2003, 2011 आणि 2015 साली भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती.

या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताने पाकिस्तानपुढे 337 धावांचं आव्हान ठेवलं. टीम इंडियाचे ओपनर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी सावध सुरुवात केली. पहिल्या काही ओव्हरमध्ये संयमी खेळी केल्यानंतर दोघांनी हाणामारी करायला सुरुवात केली. राहुल आणि रोहित यांच्यामध्ये 136 धावांची पार्टनरशीप झाली.

केएल राहुलने 78 बॉलमध्ये 57 धावा केल्या. राहुलची विकेट गेल्यानंतर रोहितने विराटच्या मदतीने रनची गती कायम ठेवली. 113 बॉलमध्ये 140 धावा करून रोहित शर्मा माघारी परतला.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply