पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयाचा 98.64 टक्के निकाल लागला आहे. त्याद्दल संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
सीकेटी विद्यालयाच्या सायन्स विभागातून 91.33 टक्के गुण मिळवत वेदांत गायकर याने प्रथम, 86 टक्के गुण मिळवत निरंजन कुलकर्णी द्वितीय व 85.83 टक्के गुण मिळवत सिद्धी म्हसकर तृतीय आली आहे. कॉमर्स विभागात 91.67 टक्के गुण मिळवत इशा सुपे प्रथम, 90.33 टक्के गुण मिळवत श्रुती सिंग द्वितीय व 88.50 टक्के गुण मिळवत आर्यन मोरे तृतीय आला आहे. तर आर्टस् विभागात 79.50 गुण मिळवत रोहित सुरवसे प्रथम, 78.33 टक्के मिळवत संस्कृती कोळी द्वितीय तर 77.17 टक्के गुण मिळवत तन्वी माने तृतीय आली आहे.
बारावीच्या परिक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाइस चेअरमन वाय. टी. देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव एस. टी. गडदे, सीकेटी विद्यालयाच्या प्राचार्या इंदू घरत यांच्यासह शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
बारावीच्या परीक्षेत कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेजचा 100 टक्के निकाल
कामोठे : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम आणि ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये सायन्स विभागामध्ये इक्रा अब्दुलगनी शेख हिने 81.80 टक्के तर कॉमर्स विभागात 86 टक्के गुण प्राप्त करून तन्नु रमेश कुमार साहु हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम आणि ज्युनिअर कॉलेजच्या सायन्स विभागातून बारावीच्या परिक्षेसाठी एकूण 141 विद्यार्थी बसले असून सर्व विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. या निकालात सायन्स विभागातून 81.80 टक्के गुण प्राप्त करुन इक्रा अब्दुलगनी शेख हिने प्रथम, शंभावी ठाकूर हीने 79.30 टक्के मिळवत द्वितीय तर स्नेहल तिवारी हीने 78.30 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच कॉमर्स विभागात तन्नू साहू हिने 89 टक्के गुण मिळवत प्रथम, 85.30 टक्के मिळवत पायल भट्ट द्वियीय तर 82.30 टक्के गुण मिळवत मीत सकपाल तृतीय आला आहे. सर्व उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौंन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.
टीएनजी कॉलेजचेही धवल यश
पनवेल : रामप्रहर वृत्त
बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या असून याचा निकाल बुधवारी (दि. 8) जाहीर झाला. या परिक्षेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्याद्दल संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम घरत ज्युनियर कॉलेज मधून राजकुमार म्हात्रे याने 75.17 टक्के गुण मिळवत प्रथम, केया ढवळे हीने 73.50 टक्के मिळवत द्वितीय तर 71 टक्के गुण प्राप्त करुन हर्ष ठाकूर याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. बारावीच्या परिक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.